शेअर बाजार झलक : अखेरच्या सत्रात बाजारात धमाल निफ्टी ५०, २२१९७ व सेन्सेक्स ७३१५८.२४ पातळीवर
अंतराळ समभागात ७ टक्क्यांपर्यंत वाढ
मुंबई: अखेरच्या सत्रात आज बाजारात मोठे चढ उतार होताना पहायला मिळाली. आज बाजारातील समभागात मोठी हालचाल पहायला मिळाली. सकाळच्या सत्रात कालच्या अखेरच्या सत्राप्रमाणे शेअर बाजाराची मंद सुरूवात होऊन सकाळी १०.५५ दरम्यान निफ्टी, सेन्सेक्स कोसळले मात्र आज भारताने अंतराळ क्षेत्रातील परदेशी गुंतवणूकीला १०० टक्के परवानगी दिल्यानंतर अंतराळ कंपन्यांच्या समभागात (शेअर) मध्ये भरघोस वाढत होत समभागाची किंमत ४ ते ७ टक्क्यांने मूल्य वाढले. विशेषतः एमटीआर टेक्नॉलॉजी, अपोलो मायक्रो सिस्टिम, पारस डिफेन्स, स्पेस टेक्नॉलॉजी अशा विविध समभागात (शेअर्स) वर ४ ते ७ टक्क्यांपर्यंत भरघोस वाढ झाली.
याचा परिपाक म्हणून बीएसी सेन्सेक्स ५० देखील १८१.८४ अंशाने वाढत २३११८.५० पातळीवर पोहोचला. व एस अँड पी सेन्सेक्स थेट ५३५.१५ अंशाने वाढत ७३१५८.२४ पातळीवर पोहोचले आहे. सर्वाधिक सेन्सेक्स पातळीचा उच्चांक ७३५२६.३९ इतका होता. सेन्सेक्स बँक निर्देशांकांत मात्र २२.२० अंशाने घसरण झाली असून निर्देशांक ५३३५१.२८ पर्यंत पोहोचला आहे. सेन्सेक्सवर ग्राफाईट, डीसीएल, साऊथ बँक, मिधानी हे शेअर्स तेजीत राहिले असून जिंद वर्ल्ड,ग्लॅक्सो, युरेका फोर्ब्स या समभागात घसरण पहायला मिळाली आहे.
निफ्टी ५० हा अखेरच्या सत्रात १६२.४० अंशाने वाढत २१२१७.४५ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टीचा निर्देशांकांचा सर्वाधिक नोंद २२२५२ पातळीपर्यंत झाली आहे. निफ्टीवर ३५ कंपन्यांच्या समभागात वाढ व १५ कंपन्यांच्या समभागावर नुकसान झाले आहे. निफ्टीवर कोल इंडिया, बजाज ऑटो, आयशर मोटर्स, आयटीसी या समभागात तेजी आली व इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, बीपीसीएल, कोटक बँक या समभागात घट झाली. निफ्टी मिडकॅप स्मॉलकॅप , निफ्टी नेस्ट ५०, १०० सगळ्याच प्रकारच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप १३९६१.९५ व स्मॉलकॅप १६११४.४५ पातळीवर पोहोचला आहे.
सकाळी घसरलेले आयटी,ऑटो समभागाने पुन्हा उभारी घेत बाजारात चांगले प्रदर्शन केले. याशिवाय मेटल, गॅस, फार्मा, कनज्यूमर ड्युरेबल्स, रिअल्टी, फायनांशियल सेवा अशा सगळ्या समभागात ' बूम ' पहखयला मिळाली आहे. अनपेक्षितपणे युएस बाजारात आज एनव्हीडीयचे समभाग वाढल्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स व तंत्रज्ञान क्षेत्रातील समभाग चर्चेत आले आहेत.