ठाकरे गटाला दणका! विदर्भातील बड्या नेत्याने ठोकला 'राम राम'

22 Feb 2024 17:53:46

Thackeray


मुंबई :
उबाठा गटाच्या पूर्व विदर्भातील नेत्या शिल्पा बोडखे यांनी गुरुवारी पक्षाला रामराम ठोकला आहे. उबाठा गटातील नेत्या विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांच्यावर आरोप करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी राजीनाम्याची माहिती दिली.
 
शिल्पा बोडखे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "मी शिवसेना पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता या पदावर प्रामाणिकपणे काम करत संघटन वाढविण्यासाठी प्रयन्त केला. पण शिवसेना भवनात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांनी सतत षडयंत्र रचून वारंवार संघटन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला."

 
"शिवसेना पक्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला किंमत आहे, असे मला वाटले होते. परंतू, आता मला कळले की, येथे विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांना पक्षाचे पूर्ण अधिकार दिले असून पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दालादेखील त्या जुमानत नाहीत," असे त्या म्हणाल्या.
 
पुढे त्यांनी लिहिले की, "मी प्रामाणिकपणे पक्षाचे अहोरात्र काम करत राहिले आणि विशाखा राऊत व रंजना नेवाळकर शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत राहिल्या. मला सोशल मिडीया या पदावर काम करायचे नाही म्हणुन मी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना पत्र देखील पाठवले. परंतू, विशाखा राऊत यांना मी काम करू नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असे वाटत आहे. जर यांना संघटन वाढविण्यापेक्षा षडयंत्र रचण्यात एवढा आनंद होत आहे तर मी आपल्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता पदाचा राजीनामा देत आहे," असेही त्या म्हणाल्या.



Powered By Sangraha 9.0