मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारीवाला माणुस हे चिन्ह मिळालेलं आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने त्यांना हे चिन्ह दिलेलं असून शरद पवार गट आता येत्या निवडणुकीत या चिन्हावर निवडणुक लढवणार आहे. याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. आता शरद पवार गटाला चिन्हही बहाल करण्यात आले आहे.
त्यानंतर शरद पवार गटाने आपल्या अधिकृत x हॅण्डलवर यासंबधी माहिती दिले आहे. त्यात त्यांनी 'एक तुतारी द्या मज आणुनी' ह्या केशवसुतांच्या कवितेतील ओळी लिहून पोस्ट शेअर केली आहे. तसेच शरद पवार गटाला हे चिन्ह मिळाल्याने त्यांनी गौरवास्पद बाब असल्याचे ही सांगितले आहे.