‘माझे आरोग्य प्रकल्प २०२३-२४’: निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी....

    22-Feb-2024
Total Views |
My Health Project 2023-24

मुंबई : ‘पीपल टू पीपल हेल्थ फाऊंडेशन’ (पीपीएचएफ)तर्फे भांडुप सोनापूर येथे एक व्यापक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचा २०० लाभार्थ्यांनी लाभ घेतला. ’माय हेल्थ प्रोजेक्ट’चा भाग म्हणून ‘जीबीबीएस हेल्थकेअर सोल्युशन्स’ आणि ‘निरभ्र फाऊंडेशन’च्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर संपन्न झाले. तत्काळ आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणे, सामान्य आरोग्य तपासणी, सल्लामसलत आणि आरोग्यसंबंधी मार्गदर्शन प्रदान करणे ही या शिबिराची काही ठळख उद्दिष्टे. ‘पीपीएचएफ’ आणि स्थानिक भागीदार ‘निरभ्र फाऊंडेशन’च्या समर्पित आरोग्यसेवा व्यावसायिकांनी या शिबिरात वैयक्तिक पातळीवर लक्ष देऊन, हे शिबीर यशस्वी करण्यावर भर दिला.

विशेषत: नियमित ‘आयसीडीएस’ आणि आरोग्य सेवा याचा यावेळी प्राधान्याने विचार करण्यात आला.या उपक्रमावर भाष्य करताना, ‘पीपीएचएफ’चे मिश्रा म्हणाले की, “आमची प्राथमिक चिंता समुदायाचे आरोग्य आणि कल्याण आहे. महिला आणि मुलांना विशिष्ट झोपडपट्टीत वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होत नाही. म्हणून हे आरोग्य शिबीर प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित करून, महिला आणि किशोरवयीन मुलांसाठी आरोग्यसेवा सुलभ करण्यासाठी आयोजित करण्यात आले होते.”

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्ताने...

भारतात दरवर्षी दि. २४ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय बालिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. मुलींच्या हक्कांबद्दल जागरुकता वाढवणे, लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे आणि देशातील मुलींना भेडसावणार्‍या विविध आव्हानांना तोंड देणे, हा या दिनाचा उद्देश. असा हा ‘राष्ट्रीय बालिका दिन’ मुलींच्या शिक्षण आणि सक्षमीकरणाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित करतो.जानेवारीमध्ये ‘जीईबीबीएस हेल्थ केअर सोल्युशन्स’ आणि ‘पीपीएचएफ’ यांनी संयुक्तपणे ‘आनंद’ नामक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी किशोरवयीन मुली खूप उत्साही आणि आनंदी दिसल्या. त्यांचा या कार्यक्रमातील सहभाग उल्लेखनीय होता. प्रत्येक क्षणात त्या अगदी आनंदाने सहभागी झाले होते.

‘पीपीएचएफ’कडून मिश्रा यांनी म्हटल्याप्रमाणे, मोहम्मदी उर्दू शाळेमध्ये प्रोजेक्ट टीमने एक महत्त्वाचा कार्यक्रम साजरा केला. हा कार्यक्रम सूक्ष्म नियोजन आणि उत्साहाने भारलेला होता. या कार्यक्रमात ८० किशोरवयीन मुलींनी आकर्षक चित्रकला आणि निबंध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. “सर्जनशील अभिव्यक्ती आणि शैक्षणिक उपक्रमांच्या मिश्रणाद्वारे जागरूकता वाढवणे आणि या तरुण मनांना सक्षम बनवणे, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. एक संस्मरणीय आणि प्रभावशाली अनुभव देण्यासाठी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला,” असे मत ‘जीईबीबीए सीएसआर’च्या सल्लागार आणि एक अनुभवी व्यक्तिमत्व असलेल्या अंजू गोडबोले यांनी यावेळी बोलताना नोंदविले.

प्रकल्प आढावा


’माय हेल्थ प्रोजेक्ट’ हा सुदृढ आरोग्याला चालना देण्यासाठीचा उपक्रम आहे. गरोदर, स्तनदा महिला, शून्य ते दोन वर्षांची मुले आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करून, आजवर २ हजार, १३७ लाभार्थ्यांना सेवा दिली आहे. तसेच दोन आरोग्य शिबिरे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.हा प्रयत्न सर्वांगीण विकास आणि आनंदी समुदाय निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो. तसेच, आमची सामाजिक बांधिलकी प्रतिबिंबित करतो.


अधिक माहितीसाठी संपर्क :
०२२-६५०२३२०९
Web: http://www.nirabhra.org