नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील मालदा येथील विवादित 'अदीना मशिद' संकुलात एका तरुण पुजाऱ्याच्या नेतृत्वाखाली हिंदूंच्या गटाने पूजा केली. ही पूजा दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आली. हिरणमय गोस्वामी असे या तरुण पुजाऱ्याचे नाव आहे.गोस्वामी यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे संरक्षित विवादित अदीना मशिदीला भेट दिली होती. येथे त्यांनी शिवलिंग आणि इतर हिंदू देवी-देवतांच्या मूर्तीही पाहिल्या. यानंतर त्यांनी आपल्या काही अनुयायांसह येथे पूजा आणि मंत्रजप करण्यास सुरुवात केली.
गोस्वामी आणि इतर हिंदूंच्या पूजेमुळे परिसरातील मुस्लिमांना त्रास झाला. त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. गोस्वामी यांना रोखण्यासाठी उपनिरीक्षक नवीनचंद्र पोद्दार येथे पोहोचले. पोद्दार यांनी गोस्वामी यांना या वादग्रस्त मशिदीत नमाज अदा करता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही बाजूंमधील तणाव वाढला. हिरणमय गोस्वामी यांनी पोलीस अधिकाऱ्याला पूजा थांबविण्याबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.गोस्वामी यांनी पोलीस अधिकारी पोद्दार यांना विचारले की त्यांचा गुन्हा काय आहे? त्यावर पोद्दार म्हणाले, तुमचा गुन्हा हा आहे की तुम्ही तुम्हाला हवं तिथं नमस्कार करताय, इथे असं होऊ शकत नाही. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. येथे पूजा करणारे गोस्वामी हे वृंदावन येथील विश्वविद्या ट्रस्टचेही प्रमुख आहेत. गोस्वामी यांनी पोलीस अधिकारी पोद्दार यांना सांगितले की, जेव्हा त्यांना येथे मूर्ती दिसतात तर पूजा का करू शकत नाही?
या प्रकरणी एएसआयने हिरणमय गोस्वामी यांच्याविरोधात मालदा येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने यासंदर्भात टेलिग्राफला सांगितले की, “आम्ही एएसआयच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवला आहे.” या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.मुळात या विवादीत अदीना मशिदीत इस्लामिक आक्रमक सुलतान सिकंदर शाहने १३६९ मध्ये हिंदू आणि बौद्ध मंदिरे पाडून बांधली होती. यापूर्वी मे २०२२ मध्ये भाजप नेते रतींद्र बोस यांनी या वादग्रस्त मशिदीच्या खाली 'आदिनाथ मंदिर' असल्याचे सांगितले होते. जितू सरदार यांनी यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिल्याचे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले होते.