‘डॉन ३’ च्या श्रृंखलेत आता कियारा अडवाणीची एन्ट्री, रणवीर सिंगसोबत शेअर करणार स्क्रिन!

20 Feb 2024 16:44:32

don 3 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांचा १९७८ साली आलेल्या ‘डॉन’ या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. यानंतर ‘डॉन २’ मध्ये शाहरुख खान झळकला होता. आणि आता याच श्रृंखलेचा तिसरा भाग अर्थात ‘डॉन ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात आता डॉन अभिनेता रणवीर सिंग असणार आहे. याशिवाय या चित्रपटात आला अभिनेत्री कियारा अडवाणी हिची एन्ट्री झाली आहे.
 
 

don 3  
 
अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी निभावलेली ही ताकदीची भूमिका रणवीर सिंग याला कितपत झेपणार आणि तो त्याचे अभिनय कौशल्य कसे दाखवणार हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान, पुढच्या वर्षी अर्थात २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘डॉन ३’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी फरहान अख्तर यांची असून निर्मिती रितेश सिधवानी करणार आहेत.
Powered By Sangraha 9.0