स्पेक्ट्रम बँडविथ सुधारण्यासाठी व्होडाफोन आयडियाचा मोठा निर्णय

20 Feb 2024 16:37:09

VI

 
मुंबई: व्होडाफोन आयडिया ( व्ही आय) ने नेटवर्क मधील उत्पादकता व दर्जा वाढवण्यासाठी केरळातील १४ जिल्ह्यातील ९०० एम एच झेड प्रकारचा स्पेक्ट्रम ९५० ठिकाणी व एलटीटीई २१०० प्रकारचा ४ जी स्पेक्ट्रम २५०० ठिकाणी (५ ते १० एम एच झेड) चा पुनर्विकास प्रकल्प तयार करण्याचे ठरवले आहेत. व्होडाफोन आयडियाने ४ जी नेटवर्क पंजाब, केरळ, कर्नाटक, हरियाणा, पंजाब या राज्यात वाढवण्यासाठी व वेगवान दर्जेदार सुविधा पुरविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
 
आपल्या जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे, ' हे नेटवर्क बांधणी करणे हे आमच्या कंपनीच्या वचनबद्धतेचा भाग आहे, डिजिटल फर्स्ट अनुभव ग्राहकांना अनुभवता येण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.'
 
कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जगबीर सिंग म्हणाले, ' या चार मार्गावर नेटवर्क आधुनिक करणे हे आमच्या प्रतिबद्धतेचे प्रतिक आहे. या आधुनिकतेचा फायदा ग्राहकांना मिळावा यासाठी आमचा हा पूर्ण प्रयत्न आहे. वाढत्या डिजिटल गरजांसाठी, एकूण जलद डेटा, व डिजिटल अनुभवात आधुनिकीकरण करणे हे आमचे मुख्य लक्ष आहे.'
 
व्हीआय आपल्या ग्राहकांसाठी विविध क्षेत्रातील सुविधा पुरवत असते.
 
Powered By Sangraha 9.0