अधिवेशनाआधी विरोधकांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; केली 'ही' मागणी

20 Feb 2024 13:07:15

Eknath Shinde


मुंबई :
मराठा आरक्षणासाठी मंगळवारी राज्य सरकारकडून विशेष अधिवेशन घेण्यात येत आहे. दरम्यान, याआधी विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्राद्वारे आरक्षणासंबंधी वेगवेगळ्या मुद्दांवर स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
मराठा आरक्षणाच्या अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र पाठवण्यात आले आहे. या विशेष अधिवेशना बाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यामुळे खालील मुद्द्यांबाबत स्पष्टता यावी, अशी मागणी यात करण्यात आली आहे.
 
यामध्ये मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण कसे देणार? ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे देणार? आणि सगे सोयरे अधिसूचना बाबत स्पष्टता द्यावी, इत्यादी मुद्दे या पत्रात मांडण्यात आले आहेत.



Powered By Sangraha 9.0