ममतांच्या जंगलराजमध्ये आणखी एक संदेशखाली! TMC नेता शेख खलील अहमदच्या विरोधात महिला रस्त्यावर

20 Feb 2024 16:26:22
 Sandeshkhali

 
कोलकाता : बंगालच्या संदेशखलीनंतर आता हावडा जिल्ह्यातील पाचला शहरात महिलांचा एक मोठा समुहाने रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. हे निदर्शन सोमवारी, दि. १९ फेब्रुवारी २०२४ झाले. तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता शेख खलील अहमद यांच्यावर गावकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. त्यांच्याच विरोधात महिला आंदोलन करत होत्या. याठिकाणी मोठ्या संख्येने महिला झाडू आणि काठ्या घेऊन निदर्शने करण्यासाठी आल्या होत्या.
 
पाचला येथील सर्वात मोठा तलाव वाळू टाकून भरला जात असल्याचा आरोप आंदोलक महिला करत आहेत. या पद्धतीने तलावावर पूल बांधण्याचे नियोजन आहे. आंदोलक महिलांनी तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता शेख खलील अहमद यांच्यावर शेतकऱ्यांची जमीन जबरदस्तीने बळकावल्याचा आरोपही केला आहे. अहमद या जमिनी अत्यंत कमी किमतीत खरेदी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
याप्रकरणी बंगाली वृत्तवाहिनी एबीपी आनंदने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जेव्हा येथील लोकांनी अहमदच्या बेकायदेशीर कारवायांवर प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्याच्या गुंडांनी लोकांवर हल्ला केला. त्याच्या गुंडांनी १८ फेब्रुवारीला हा हल्ला केला. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
 
मात्र, योग्य कारवाई होत नसल्याचे पाहून पांचाळ येथील महिलांनी हे प्रकरण स्वत:च्या हातात घेतले आणि सोमवारी दि, १९ फेब्रुवारी २०२४ झाडू आणि काठ्या घेऊन रस्त्यावर उतरल्या. याठिकाणी आंदोलन करताना त्यांनी या तलावात वाळूची वाहतूक करणारी वाहनेही अडवली.
 
 
Powered By Sangraha 9.0