जिपीटी हेल्थकेअर आयपीओ : आयपीओ प्राईज बँड १७७ ते १८६ रुपये प्रति शेअर

20 Feb 2024 18:13:50

GPT IPO
 
मुंबई: कलकत्तास्थित हॉस्पिटल साखळी असलेल्या जिपीटी हेल्थकेअर लिमिटेडचे आयपीओ बाजारात येणार असल्याची घोषणा झाली आहे. २२ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२४ या काळात सबस्क्रिप्शनसाठी हे आयपीओ खुले असतील. अँकर गुंतवणूकदारांना २१ फेब्रुवारी ही तारीख जाहीर झालेली आहे. याशिवाय रद्द झालेल्या रकमेचा परतावा तारीख २८ फेब्रुवारी असणार आहे. ऑफर फॉर सेलसाठी कंपनीचे २.६१ कोटी समभाग ( विक्रीसाठी) उपलब्ध असणार आहेत. आयपीओ प्राईज बँड १७७ ते १८६ रुपये प्रति शेअर हा कंपनीकडून वितरणासाठी जाहीर केला गेला आहे.
 
शेअर्स हे २९ फेब्रुवारी २०२४ रोजी स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड ( नोंदणीकृत) होणार आहेत. एकूण आयपीओ ऑफर फॉर सेल व इक्विटी शेअर्सचा संच असणार आहे. इक्विटी शेअर्सची किंमत ४० कोटी रूपयांची असणार आहे. यासाठी सांगण्यात आलेल्या ऑफर फॉर सेल मध्ये खाजगी इक्विटी बनयान कंपनी २.६ कोटींची इक्विटी गुंतवणूक करणार आहे. यामध्ये जमा झालेल्या ३० कोटी निधीतून कंपनी कंपनीच्या दैनंदिन कामकाजातील खर्च व थकित देय देण्यासाठी वापरणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
 
जिपीटी हेल्थकेअर कंपनीचे संस्थापक व प्रमोटर द्वारिका प्रसाद टांटिया, डॉ ओम टांटिया, श्रीगोपाळ टांटिया हे आहेत. सध्या कंपनीच्या मालकीची चार इस्पितळे आहेत. २००० साली ८ बेडच्या इस्पितळातून सुरूवात करुन आज जिपीटी हेल्थकेअर कंपनीचे ५६१ बेड क्षमतेची इस्पितळे आहेत. टांटिया कुटुंबाचे कंपनीत ६७.३४ टक्क्यांचा हिस्सा आहे.
 
कंपनीला आर्थिक वर्ष २१ ते २३ मध्ये २१.९५ टक्क्यांची सीएजीआर ( कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट) वाढ झाली असून आर्थिक वर्ष २३ मध्ये कंपनीचा महसूल ३६१.०४ कोटी इतका वाढला होता. खर्च वगळता निव्वळ नफा २०.५३ टक्क्याने वाढत ८० कोटी रुपये झाला होता.
 
Powered By Sangraha 9.0