शेअर बाजारात दे धना धन निफ्टी नव्या उच्चांकांच्या पायथ्याशी सेन्सेक्सही वाढला

19 Feb 2024 11:36:56

stock market
 
 
मुंबई: आज कालच्या सुट्टीअखेरीस बेंचमार्क निर्देशांकात अखेर वाढ झाली असून युएस उत्पादनातील किंमती वाढल्याचा फायदा आज भारतीय बाजारात जाणवत आहे. सकाळच्या सत्रात बीएसी सेन्सेक्स ५२ अंशाने वाढून ७२४७८ पातळीवर, एनएससी सेन्सेक्स ४३ अंशाने वाढत २२०८२ पातळीवर पोहोचला आहे. एनटीपीसी, एसबीआय, नेसले, बजाज फायनान्स यां कंपन्यांच्या शेअर्समध्ये भरभराट पहायला मिळाली. मात्र दुसरीकडे विप्रो, टीसीएस या समभागात ( शेअर्स) मध्ये थोडी पडझड पहायला मिळाली आहे. निफ्टीवर बजाज ऑटो डॉ रेड्डीज, अदानी एंटरप्राईज, अदानी पोर्ट, कोल इंडिया या समभागात भाववाढ पहायला मिळाली‌.तसेछ एक्सिस बँक, विप्रो, एचडीएफसी लाईफ या समभागात घट झाली आहे.
 
निफ्टी ५० मध्ये १९६.१७ अंशाने वाढ झाली असून निफ्टीने २२१४२.०० ची पातळी पार केली आहे. निफ्टी बँक ४६६९ पातळीला पोहोचला ज्यामध्ये तब्बल २८४.७० (०.६१%) अंशाने वाढला आहे. निफ्टीत एफएमसीजी सेक्टरमधील समभागावर सर्वात जास्त भाववाढ झाली असून आयटी समभागावर मात्र फटका बसला आहे. युएस बाजारात क्रुड तेलाचे भाव कमी झाले होते.
 
निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅप मध्ये अनुक्रमे ३४.१५ अंशाने, १६.९० अंशाने सकाळच्या सत्रात वाढ पहायला मिळाली. बीएसी मिडकॅप व स्मॉलकॅप अनुक्रमे ८.८९ अंशाने व ७.८९ अंशाने वाढ पहायला मिळाली आहे. विशेषतः फार्मा शेअर समभागावर मोठी वाढ झालेली आहे. शेवटच्या ५२ आठवड्यात निफ्टी निर्देशांक सगळ्यात जास्त वाढून २२१२६.८० चा अंक गाठला आहे . इंट्राडेमध्ये निफ्टी ५० वाढत रेकोर्डब्रेक २२१५०. ७५ पर्यंत पोहोचला आहे.
 
Powered By Sangraha 9.0