शेअर बाजार झलक: मार्केटची 'जादू 'कायम निफ्टी २२१८७, सेन्सेक्स ७२७०८ पार

19 Feb 2024 16:15:27

stock market
 
 
 शेअर बाजार झलक: मार्केटची 'जादू 'कायम निफ्टी २२१८७, सेन्सेक्स ७२७०८ पार
 

सेन्सेक्स २८२ अंशाने वाढत ७२७०८ पातळीवर निफ्टी ८१ अंशाने वाढत २२१८७ चा आकडा पार
 

मुंबई: आज सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात मोठी ' बूम' पहायला मिळाली होती. एनएससीने २२००० ची पातळी ओलांडून सेन्सेक्सनेही चमकदार प्रदर्शन केले होते. अखेरच्या सत्रात बाजार बंद होताना ती जादू कायम राहत सेन्सेक्सने उसळी मारत ७२७०८ चा टप्पा गाठला असून निफ्टी आपला विक्रम प्रस्थापित करत २२१८७ पातळीवर बंद झाला आहे.
 
इक्विटी बाजारातील आज एक महत्वाचा दिवस मानला जातो आहे. बीएसी सेन्सेक्स २८२ अंशाने वाढत ७२७०८ पातळीवर व एनएससीवर निफ्टी ८१ अंशाने अधिक जात २२१८७ चा आकडा पार केला आहे.
 
बँक निफ्टी निर्देशांक १५०.६५ अंशाने वाढत (०.३२ टक्क्याने) वाढत ४६५३५.५० पातळीवर पोहोचला आहे. आज बहुतांश उद्योगांमधील समभाग सकारात्मक दिसले असून अपवादात्मक रिअल्टी समभाग मागे पडले. सकाळप्रमाणेच कनज्यूमर ड्युरेबल्स, एफएमसीजी, फार्मा समभागात मोठी वाढ अखेरीस पहायला मिळाली आहे. निफ्टीवर ग्रासिम इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, अदानी मोटर्स हे शेअर्स तेजीत होते.
 
दुसरीकडे एल अँड टी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एचडीएफसी लाईफ, टीसीएस,टाटा मोटर्स हे समभाग मात्र कोसळले आहेत. निफ्टी ५० मध्ये २२१२२.२५ पातळी ओलांडली असून ८१.५५ अंशाने निर्देशांक वाढला. निफ्टी सर्वात जास्त २२१८६.६५ पर्यंत पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक १६३.८१ अंशाने वाढत ५२,७९२ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी मिडकॅप स्मॉलकॅप हा अनुक्रमे ०.६ व ०.५ टक्क्याने वाढला आहे. एकूणच बाजारात आज उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले होते.
 
Powered By Sangraha 9.0