कट्टरपंथीयांकडून 'गोसेवक साधराम' यांचा खून; आरोपींचे दहशतवादी कनेक्शन उघड

19 Feb 2024 11:51:00
 Gosevak Murder
 
रायपूर : छत्तीसगडमधील कावर्धा येथील लालपूर गावात दि. २० जानेवारी २०२४ रोजी अयाज, इद्रिश, मेहताब आणि शेख रफीक यांच्यासह सहा जणांनी मिळून गोसेवक साधराम यादव (५०) यांचा आयएसआयएस दहशतवाद्यांप्रमाणे गळा चिरून खून केला होता. दि. २२ जानेवारीला होणाऱ्या रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी दहशत पसरवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले होते.
 
गोसेवक साधराम यादव यांच्या हत्येप्रकरणी छत्तीसगडमध्ये बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काश्मीरमधून परतल्यानंतर अयाज खानने त्याच्या साथीदारांसह इस्लामिक दहशतवादी संघटना ISIS च्या शैलीत गोसेवकाचा गळा चिरला. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हे केले गेले.
 
या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींवर यूएपीएच्या १६ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी अयाज आणि इद्रिसचे दहशतवादी कनेक्शनही समोर आले आहे. अयाज काश्मीरमध्ये जाऊन इद्रिसच्या संशयित लोकांना भेटल्याचीही माहिती मिळाली आहे. राज्यात नक्षलवाद्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबतीत यूएपीए लावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
आरोपींनी साधाराम यादव यांच्याशी आधी जाणूनबुजून भांडण करून त्याचे डोके फाडून खून केला होता. त्याच्या हत्येनंतर कावर्धा येथील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपींना अटक करण्यासोबतच प्रशासनाने त्यांच्या घरांवर बुलडोझरचा वापरही केला. तपासानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध यूएपीए कलमही जोडले आहे. कावर्धाचे एसपी अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, हत्येतील आरोपी अयाज काश्मीरमध्ये ये-जा करत असे, तर इद्रेश संशयास्पद लोकांशी बोलत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
 
त्याने सांगितले की, अयाज खानला अटक करून त्याचा मोबाईल तपासला असता तो जम्मू-काश्मीरला गेल्याची माहिती अनेक वेळा समोर आली. छत्तीसगडमधील पथक जम्मू-काश्मीरला पाठवले असता, दहशतवाद्यांशी असलेले संबंध समोर आले. दुसरा आरोपी इद्रेश खान संशयितांशी बोलत असल्याची माहिती मिळाली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0