दैवज्ञ कलाविष्कार सोहळा संपन्न; ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जीवनगौरव

18 Feb 2024 21:35:52
Daivadnya Kalavishkar Sohla in Thane

ठाणे :
ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आज ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दैवज्ञ कलाविष्कार सोहळा २०२४ पार पडला. सदर कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख डॉ. विशाल कडणे यांनी केले.

या कार्यक्रमादरम्यान, ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यावेळी अखिल भारतीय दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष डॉक्टर. रत्नपारखी , भाजपचे प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, आमदार श्याम सावंत, जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर ,सुहास परांजपे ,शेखर फडके ,निमेश कुलकर्णी, मयूर वैद्य ,धनश्री काडगावकर ,विकास चव्हाण यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते.

या सोहळ्यामध्ये विशेष मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दैवज्ञ कलाविष्कार सोहळ्यामध्ये शिरीष देवरुखकर आणि हर्षिता हाटे यांच्यासह अनेक गायक आणि नृत्य कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या यामध्ये संदीप कारेकर आणि आदिती कारेकर या पिता पूत्री यांचा समावेश होता तर डोळ्यांनी अंधत्व असलेला डोंबिवली येथील अपूर्व महाजन याने ३ गाणी गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली अत्यंत सुंदर अशा या सादरी करणामुळे उपस्थित सर्व ज्ञाती बांधव मंत्रमुग्ध झाले होते.
Powered By Sangraha 9.0