'नॉटी बॉय'द्वारे मिळणार हवामानाचा अचूक अंदाज!

17 Feb 2024 13:05:03
isro launch GSLV-F14/INSAT-3DS Mission

नवी दिल्ली : 
'आदित्य एल १' व 'चांद्रयान ३' यांसारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वी केल्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (इस्त्रो) नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. इस्त्रो आज दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी 'GSLV-F14' या प्रक्षेपकाच्या मदतीने सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण करणार आहे.


दरम्यान, 'INSAT-3DS' या हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणारा हा उपग्रह या मोहिमेच्या माध्यमातून अवकाशात पाठविण्यात येणार आहे. इस्त्रोच्या माहितीनुसार, आज सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी हा उपग्रह प्रक्षेपकाच्या साहाय्याने अवकाशात झेप घेईल. या उपग्रहाचे वजन २हजार २७४ किलो असणार आहे. 

विशेष बाब म्हणजे 'INSAT-3DS' या उपग्रहास खास टोपणनावदेखील देण्यात आले आहे. सदर उपग्रहास 'नॉटी बॉय' असे टोपणनाव देण्यात आले आहे. एकंदरीत, याच 'नॉटी बॉय'च्या माध्यमातून आगामी काळात देशाला अचूक हवामान अंदाज बांधता येणार आहे.
Powered By Sangraha 9.0