"राज ठाकरे-नारायण राणेंनी शिवसेना का सोडली?", शिंदेंनी केली ठाकरेंची पोलखोल

    17-Feb-2024
Total Views |
eknath Shinde news

कोल्हापूर : शिशिर शिंदे यांनी वानखेडे खणून जेलमध्ये गेले, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले लोक इथे आहेत. त्यांनी मोठा संघर्ष केलाय.तुम्ही आयत्या पिठावर रेखोट्या मारून आले त्या देखील नीट मारता आल्या नाहीत. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या अपमान केला, रामदास भाईचा ही तशाच अपमान करण्यात आला. नारायण राणे, राज ठाकरे, त्यांच्यापासून तुम्हाला काय त्रास होता..? पण त्यांना तुम्ही दूर सारलं. माझ्या विभागात हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळे मला तुम्ही सांगितले असते तर मी मनमोकळेपणाने सगळे सोडून दिले असते,अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुर दौऱ्यात घेतलेल्या सभेत केली.

शिवसैनिकांचे खच्चीकरण होत असताना शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केले. पुन्हा असे धाडस कधी होईल असे वाटत नाही.माझ्यासोबत ४० आमदार काही मंत्री त्यांनी पदे सोडली, माणूस सत्तेत जातो पण सत्तेतून पायउतार होण्याचा निर्णय आम्ही घेतला छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला होता.शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबवण्यासाठी पक्षप्रमुख स्वतःचा विचार करतो तो अविचार टाळण्यासाठी आम्हाला वेगळा विचार करावा लागला असता, असे ही शिंदे यावेळी म्हणाले.