महावितरण संचालकांकडून भांडुप परिमंडळाचा दौरा

17 Feb 2024 13:25:26
Mahavitaran Director on Bhandup Parimandal Tour

मुंबई : 
महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांनी भांडुप परिमंडळाचा दौरा केला. यावेळी, त्यांनी प्रामुख्याने ठाणे व वाशी मंडळाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत ताकसंडे म्हणाले कि, 'ग्राहकसेवेला प्राधान्य देऊन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे. तसेच, ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी, ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे देयक वसुल करणे ही तितकेच गरजेचे आहे. म्हणून थकीत वीजबिल वसुली वर भर द्यावे.

दरम्यान, या बैठकीस भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम, वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड व भांडुप परिमंडलातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी भांडुप परिमंडलात सध्या सुरु असलेल्या विविध कामाबाबत माहिती दिली.

याशिवाय, गैरप्रकारातून वीज वापरात असलेल्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून प्रामाणिक ग्राहकांना त्याचा नुकसान होऊ नये". औद्योगिक ग्राहकांसाठी नुकतेच सुरु केलेल्या स्वागत कक्षाच्या माध्यमातून या वर्गवारीतील ग्राहकांना तत्पर सेवा देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. नियोजित पद्धतीने काम करून उत्तम ग्राहक सेवा देण्याची ग्वाही सर्व अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.


Powered By Sangraha 9.0