आंबेडकरांचा ठाकरेंना दे धक्का; या बड्या नेत्यांचा समर्थकांसह वंचितमध्ये प्रवेश

16 Feb 2024 16:30:43
ambedkar
 
हिंगोली : ठाकरे गटाचे मराठवाडा संघटक डॉ. बी. डी. चव्हाण आणि अकोला जिल्ह्यातील विद्यमान ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्या गायत्री कांबे यांचे पती संगीत कांबे यांनी समर्थकांसह वंचित  बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.
 
हे दोन हिंगोली आणि अकोला जिल्ह्यातील महत्वाचे नेते मानले जातात. डॉ. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत या दोन नेत्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यासोबत २०० ते ३०० कार्यकर्त्यांनीही वंचितमध्ये प्रवेश केला आहे. बि. डी. चव्हाण हे २००९ पासुन लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असल्याच बोलल जात होत पण तीन वेळा त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती. चव्हाण यांनी १९९७ ला जनता पक्षाकडुन व २००९ ला बहूजन समाज पार्टी कडुन लोकसभा निवडणुक लढवली होती.
 
चव्हाण यांनी २०१४ ला किनवट विधानसभा सुद्धा लढवली होती. त्यांचा या तीनही निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांना आता वंचित बहुजन आघाडीकडुन हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले जाणयाची शक्यता वर्तवली जात आहे. चव्हाण यांच्या पत्नीही सध्या ठाकरे गटाच्या पदाधीकारी आहेत त्या सुद्धा लवकरच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे.

Powered By Sangraha 9.0