जागतिक मंदीचे सावट असतानाही शेअर बाजारात आज उसळी

16 Feb 2024 11:19:46

stock market
 
जागतिक मंदीचे सावट असतानाही शेअर बाजारात आज उसळी
 
 
सेन्सेक्स ३५० अंशाने वाढत ७२३५० वर पोहोचला निफ्टी ५० ची २२००० पातळी पार
 
 
बीएससी मिडकॅप व स्मॉलकॅप , गिफ्ट निफ्टीतही वाढ फार्मा शेअर्स मात्र मंदीत
 

मुंबई: काल अखेरच्या सत्रात अनेक प्रमुख कंपन्यांच्या समभागात (शेअर्समध्ये) तेजी पहायला मिळाली आहे. काल बँक निफ्टी बरोबरच गिफ्ट निफ्टीदेखील तेजीत राहिला होता. निश्चितच सेन्सेक्स निफ्टीत पुन्हा वाढ होण्याची चिन्हे असताना आज सकाळचे सत्र सुरू झाल्यानंतर आज सेन्सेक्स ३५० अंशाने वाढला असून निफ्टी पातळीत २२००० चा टप्पा पार केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ही खूप मोठी वाढ समजली जाते. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात त्यामुळे मोठी वाढ पहायला मिळत आहे.
 
सेन्सेक्स ३०० अंशाने वाढल्याने ७२३५० पातळीवर पोहोचले आहे. काल अखेरच्या सत्रात ऊर्जा फार्मा कंपनीचे शेअर्स मंदीत राहिलेले होते त्याची आज सकाळी पुनरावृत्ती घडली आहे.मात्र पीएसय असलेल्या कोल इंडिया, बीपीसीएलच्या समभागात वाढ झाली आहे ‌
 
बीएससी मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकात ०.६, ते ०.८ टक्क्याने वाढ झाली आहे. निफ्टी पीएसयु बँक निर्देशांकात १ टक्क्याने वाढ पहायला मिळाली आहे. पाश्चिमात्य देशात मंदीची झळक डोकावत असली तरी आशियाई देशांतील वाढलेले उत्पादन, विकासदर पाहता शेअर बाजारात आज उत्साहवर्धक वातावरण पहायला मिळत आहे.
 
काल निफ्टी ५० २१९११ पातळीवर बंद झाला होता आज सकाळी सत्राच्या सुरुवातीला २२०२० पातळीवर पोहोचला. काल प्रमाणेच गिफ्ट निफ्टीत १७० अंशाने वाढ होत २२०८२.५० पातळीवर पोहोचला आहे.
 
Powered By Sangraha 9.0