शेअर बाजार झलक: आजही बाजार सकारात्मक सेन्सेक्स ३७६ अंशाने व निफ्टी १३० अंशाने वाढला
युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करेल या आशेचा दृष्टीकोन आज बाजारात पहायला मिळाला
मुंबई: शुक्रवारी अखेरच्या सत्रात बेंचमार्क इंडायसेस एनएससी निफ्टी व बीएसी सेन्सेक्समध्ये गोड शेवट पहायला मिळत आहे. निफ्टीची पातळी १३० अंशाने (०.५९ %) वाढत २२०४० पातळीवर पोहोचली आहे. सेन्सेक्स ३७६ अंशाने (०.५२%) ने वाढत ७२४२६.६४ पातळीवर पोहोचला आहे. युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करेल या आशेचा दृष्टीकोन आज बाजारात पहायला मिळाला. निफ्टी ५० २२०४०.७० पातळीवर गेला असून सेन्सेक्स ३७६ अंशाने वाढत ७२४२६.६४ पातळीवर बंद होण्याचे मुख्य कारण म्हणजे सकाळच्या सत्रात आशियाई गुंतवणूकीची आशा व प्रगती यामुळे आज प्रमुख स्टॉकचे भाव चढेच राहिले आहेत .
मुख्यतः तेल, गॅस, पीएसयु बँकेचे शेअर काल प्रमाणेच आजही तेजीत आढळले आहेत. तेल गॅस समभाग ( शेअर्स) ०.६१ टक्के व पीएसयु बँकेचा समभागात ०.८३ टक्क्याने वाढ झाली. विशेषतः काल फार्मा शेअर घसरले असताना अखेरच्या सत्रात समभाग १.६३ टक्के या सकारात्मक दराने बंद झाले आहेत. सेन्सेक्सवर महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, एल अँड टी, टाटा मोटर्स हे समभाग तेजीत राहिले असून रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, एक्सिस बँक हे शेअर्स मात्र घसरले आहेत. आज ऑटोमोबाईल समभागात देखील थोडी वाढ पहायला मिळाली आहे. रियल्टी, फार्मा, आयटी, हेल्थकेअर या शेअर्सच्या समभागात सरासरी १ ते २ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली आहे.
निफ्टीवर विप्रो, महिंद्रा अँड महिंद्रा एसबीआय लाईक फ इन्शुरन्स, एल अँड टी, लार्सन ट्युब्रो हे शेअर्स तेजीत पहायला मिळाले. दुसरीकडे पावरग्रीड, ओएनजीसी स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज समभागात घट झाली आहे. निफ्टी मिडकॅप स्मॉलकॅप समभागात अनुक्रमे २६५.२५ अंशाने व ११.७० अंशाने वाढ पहायला मिळाली आहे. निफ्टी बँक निर्देशांक १५०.८५ टक्क्याने वाढत ४६३६९.७५ पातळीवर पोहोचला आहे.
एकूणच शेअर बाजारात ' फंडांमेंटल' समभागावर अधिक भर दिला गेल्याचे जाणवले आहे. भारतीय गुंतवणूकीतील चलती, एवढ्यात झालेले सामंजस्य करार, व युएस फेडरल रेट कट या आशेने आज मार्केटचे शेवटचे सत्र बंद झाले आहे