रिझर्व्ह बँकेची पेमेंट कार्ड नेटवर्कसला नोटीस

16 Feb 2024 15:17:02

Visa
 
 
रिझर्व्ह बँकेची पेमेंट कार्ड नेटवर्कसला नोटीस


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अनाधिकृत बीटूबी व्यवहार करण्यास मनाई
 
 
मुंबई: द रिझर्व्ह बँक (आरबीआय)ने सर्व पेमेंट कार्ड नेटवर्कला कंपनीच्या नावाशिवाय पैशाची देवाणघेवाण (ट्रान्स्फर) करण्यास मनाई केली आहे. म्हणजेच बिझनेस टू बिझनेस (बी टू बी) साठी व्यवसायिक विनाओळख पैसे यापुढे पाठवू शकत नाही.आरबीआयच्या माहितीनुसार काही आर्थिक संस्था तिसऱ्या संस्थेकडून पैशांची ' सेटलमेंट ' करत असल्याचे आरबीआयच्या निरिक्षणात आले होते. यामुळे आरबीआयच्या पैसे व्यवहार व ओळखपत्र नियमाचे उलंघन होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
 
आरबीआयने पुढील तपासापूर्वी या पेमेंट कार्ड नेटवर्क कंपनीना व्यवहारांना स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु क्रेडिट कार्डसाठी दैनंदिन व्यवहारात कोणताही अडथळा येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मिडिया वृत्तानुसार या पेमेंट कंपन्यांनी केवायसी अटींचे उलंघन केल्याचा आरोप आरबीआयने केला आहे ‌. पेटीएम पेमेंट बँकेवरील कारवाईनंतर आरबीआयने फिनटेक व कार्ड कंपन्यांबद्दल कडक पवित्रा घेतला आहे.
 
 
बिझनेस पेमेंट सोल्युशन्स प्रोव्हाईडर कंपन्यांचा व्यवहारामध्ये नक्की भूमिका काय आणि त्याची कशी अंमलबजावणी केली जाते याची चौकशी आता आरबीआयकडून होणार आहे. विशेषतः या चौकशीच्या नोटीस विसा, मास्टरकार्ड या नामांकित कंपन्यांना मिळाल्या असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. मुख्यत्वे अशा प्रकारच्या व्यापारी आवकजावक पेमेंट सेटलमेंट एनईएफटी ,आरटीजीएस प्रणालीतून केली जाते.
 
Powered By Sangraha 9.0