आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून व्हिडिओ बनवता येणार!

16 Feb 2024 17:11:19

Open ai
 
 
आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून व्हिडिओ बनवता येणार!
 
 
ओपन ए आय ने सोरा नावाच्या सॉफ्टवेअरची निर्मिती

 
हे सॉफ्टवेअर टेक्स्ट प्रॉम्प्ट कंपनीच्या माध्यमातून एक मिनिटापर्यंत व्हिडिओ तयार करणार
 

मुंबई: सध्याच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वादळ घोंघावत असतानाच मुख्य तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा चालू झाली आहे. या ए आय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वर मतमतांतरे असली तरी त्याचा वापर प्रत्येक औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये वेगाने वाढला आहे. परिणामी नवीन नोकरी मिळविताना आपले एक आय कौशल्य तपासण्यासाठी नोकरीचे उमेदवार आपली कंबर कसत आहेत. अशाच मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या पाठिंब्यावर ए आय कंपनी ' ओपन एआय' ने एक आय मार्फत व्हिडिओ निर्मिती करणार असल्याचे घोषित केले आहे.
 
या अनुषंगाने ओपन ए आय कंपनी सोला नावाचे सॉफ्टवेअर तयार करत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. हे सॉफ्टवेअर टेक्स्ट प्रॉम्प्ट कंपनीच्या माध्यमातून एक मिनिटापर्यंत व्हिडिओ तयार करणार असल्याचे समजते आहे.
 
जाहीरातनाम्यात सांगितल्याप्रमाणे, 'सोरा' च्या आधाराने कठीणातील कठीण विषय, क्लिष्ट गोष्टी मोशन, वेगवेगळी पात्रे, क्षण चित्रण तयार करता येणार आहे. सध्या हे सॉफ्टवेअर रेड टेमिंगसाठी वापरण्यात येते आहे.ए आय क्षेत्रातील तूटी व्हिज्युअल आर्टिस्ट, डिझायनर यांना कळविण्यात येण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर होतो.
 
हे व्हिडिओ तयार करणारे सॉफ्टवेअर २०२२ ला सुरू झालेल्या ओपन ए आयच्या ' चाटजिपीटी चाटबोट प्रणालीवर काम करते. यातून विविध सुविधा ग्राहकांना वापरता येणे सहज शक्य झाले आहे. गुगलचे अल्फाबेट, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांमध्ये एक आय विकासासाठी मोठी स्पर्धा चालू झाल्याचे दिसून येत आहे. या निमित्ताने सोराने विकसित केलेला व्हिडिओ इंटेलिजन्स मार्फत ओळखण्यासाठी ओपन ए आय नवीन टूल निर्मिती करत असल्याची माहिती मिळाली आहे ‌
 
यामुळे आगामी काळात ए आय माध्यमातून व्हिडिओ जनरेशनसाठी मोठी स्पर्धा चालू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
Powered By Sangraha 9.0