"पार्लमेंटमध्ये बेस्ट अवॉर्ड मिळवून काही होत नाही!", ताईंना सणसणीत टोला
16 Feb 2024 14:33:52
पुणे : राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी बारामती इथे भाषण करत असताना. पार्लमेंटमध्ये बेस्ट अवॉर्ड मिळवून काही होत नाही अस म्हणत सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला लगावला आहे. आपल्या भाषणात अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवारांच्या तुफान फटकेबाजीनं भाषणात एकच हशा पिकला.
अजित पवारांनी "मी फक्त सेल्फी काढत फिरत नाही" असा टोलाही सुप्रिया सुळेंना लगावला. मी कुठलाही पक्ष चोरला नाही. मी काल, आज आणि उद्याही राष्ट्रवादीतच आहे. मी पक्षातील प्रमुख नेत्यांना विश्वासात घेतल आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते. असही अजित पवार पुढे म्हणाले.
"या निवडणुकीला काही लोक भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, पण भावनिकतेने रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. मार्चच्या पहील्या आठवड्यात आचारसंहीता जाहीर होईल. सर्व संस्थांचे सदस्य, पदाधीकारी कार्यकर्ते सर्वांनी बाहेर पडला पाहीजे. आपल्याला देशात आणि राज्यात एनडीएच सरकार आणायच आहे. त्या सरकारच्या माध्यमातुन आपल्या मतदारसंघाचा, राज्याचा कायापालट करुन घ्यायचा आहे". अस ही ते आपल्या कार्यक्रत्यांनी उद्देशुन म्हणाले.