लोअर परळ येथील २१ अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा

16 Feb 2024 19:36:42
BMC Takes Action on Lower Parel iIlegal Construction

मुंबई : स्वच्छ मुंबईसाठी मुंबई महापालिका सर्व प्रभागात स्वच्छता अभियान राबवत आहे. ही मोहिम राबवताना आढळणारी अनधिकृत बांधकामे तसेच बेवारस वाहनांवर पालिकेकडून धडक कारवाई केली जाते आहे. या कारवाईत लोअर परळ रेल्वेस्थानक परिसरातील २१ अनधिकृत शेड, ४ अनधिकृत स्टॉल्स पालिकेने हटवले आहेत.

यावेळी ५६ वेवारस वाहनांवरही कारवाई केली, तर ८७ बेवारस वाहनांना हटवण्यातकरीता पालिकेने नोटिस बजावल्या असल्याची माहिती 'जी दक्षिण' विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी शुक्रवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी दिली.

मुंबईत स्वच्छ ठेवण्यासाठी मुंबईतील सर्व प्रभागात स्वच्छता मोहिमेंतर्गत रस्ते, गल्ल्या, चौक, झोपडपट्टी परिसर स्वच्छ केला जातो आहे. स्वच्छतेबाबत पालिकेकडुन जनजागृतीही केली जाते आहे. या स्वच्छतेमोहिमेसह अनधिकृत बांधकामांवर तसेच रस्त्याच्या बाजूला बेवारसपणे पडून असलेल्या वाहनांवरही कारवाई केली जाते आहे.

या स्वच्छता मोहिमेंतर्गत 'जी दक्षिण' विभागात राबवण्यात आलेल्या मोहिमेत लोअर परळ येथील रेल्वे परिसरात, परिसरालगतच्या मार्गांवर, ना. म. जोशी मार्ग या रस्त्यावर पालिकेने अनधिकृत बांधकामांवर विविध विभागांसोबत संयुक्त कारवाई करण्यात आली असल्याचे धोंडे यांनी सांगितले. या अभियानासाठी एक जेसीबी, तीन लॉरी, दोन डंपर, दोन यूटीलीटी गाडी आदी यंत्रसामग्री आणि ५० हून अधिक अधिकारी व कामगार उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0