राज्यसभा निवडणूकीत मोठा ट्विस्ट! 'हा' असेल सातवा उमेदवार

15 Feb 2024 19:27:48

Rajya Sabha


मुंबई :
राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. महायुतीच्या ५ आणि महाविकास आघाडीच्या एका नेत्याने उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर आता अपक्षाने सातवा अर्ज भरला आहे. विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
 
येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभा निवडणुक होणार आहे. त्यासाठी गुरुवारी सर्व पक्षांच्या नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये भाजपकडून अशोक चव्हाण, अजित गोपछडे, मेधा कुलकर्णी, शिवसेनेकडून मिलिंद देवरा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला. यासोबतच काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांनीदेखील उमेदवारी अर्ज भरला.
 
त्यानंतर आता राज्यसभेसाठी सातवा अर्जदेखील दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून हा अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, या सातही उमेदवारी अर्जांची शुक्रवारी छाननी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 
Powered By Sangraha 9.0