वेंदाता आपले काही भागभांडवल जीक्यूसी पार्टनरला विकणार

15 Feb 2024 12:52:56

Vedanta
 
 
वेदांता आपले काही भागभांडवल जीक्यूसी पार्टनरला विकणार
 

१ अब्ज डॉलर्सचे हे नवे 'डिल' होणार असल्याची माहिती समोर
 
 
मुंबई: प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अग्रवाल संचलित आपल्या कंपनी वेदांताचा काही भागभांडवल राजीव जैन यांच्या जीक्यूसी पार्टनरला विकणार असल्याचे सांगितले आहे. येणाऱ्या काही दिवसांत यांची अंमलबजावणी होणार आहे. याबद्दल संपूर्ण चर्चा झाली असून १ अब्ज डॉलरला हा व्यवहार होण्याची माहिती समोर येत आहे.
 
बुधवारी एनएससीवर वेदांता समभाग (शेअर) २८२.५५ ने वाढला असल्याचे पहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून उद्योजक अनिल अग्रवाल यांच्यावर ७७९ लाख डॉलरचे कर्ज थकीत होते. यासाठी वेदांता चर्चेत आले होते.
 
अखेरीस आपली देणी चुकती करण्याकरिता भांडवल वाढवण्यासाठी वेदांताने हा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर २३ मध्ये वेदांताचा निव्वळ नफ्यात मोठी घट पहायला मिळाली होती. डिसेंबर तिमाहीत सुमारे १८.३० टक्क्याने नफ्यात घसरण झाली.
 
Powered By Sangraha 9.0