शेअर बाजार झलक: दिवसाच्या अखेरीस सेन्सेक्स २२८ अंशाने व निफ्टी २१९०० पातळीवर पोहोचला

15 Feb 2024 17:33:42

stock market
 
 
अखेरच्या सत्रात सेन्सेक्स २२८ अंशाने वाढला निफ्टी २१९०० पातळीवर पोहोचला
 

बेंचमार्क निर्देशांक सकाळच्या सत्राप्रमाणे तेजीत राहिला
 
 
मुंबई: आज अखेरच्या सत्रानंतर बेंचमार्क निर्देशांक सकाळच्या सत्राप्रमाणे तेजीत राहिला. शेवटच्या सत्राच्या अखेरीस आज निफ्टी २१९०० पार झाला असून सेन्सेक्स २२७.५५ अंशाने (०.३२%) वाढत ,७२०५०.३८ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ७०.८० अंशाने (०.३२) वाढत २१९१०.८० पातळीवर पोहोचला आहे. आज एम अँड एम, बीपीसीएल,ओएनजीसी,एनटीपीसी हे शेअर्स तेजीत पहायला मिळाले असून नेसले इंडिया, आयटीसी, एक्सिस बँक या शेअर्सच्या भावात घट झाली आहे.
 
आधीपेक्षा बँक निफ्टी ०.६८ टक्क्याने म्हणजेच ३१०.६० अंशाने वाढला आहे. विशेषतः एस अँड पी स्मॉलकॅप व मिडकॅप निर्देशांकांत घसघशीत वाढ होत ५५४.५९ अंशाने वाढलेले बाजारात पहायला मिळत आहे. वेदांतांच्या बातमीनंतर ११.७० टक्क्याने समभाग (शेअर) घसरत २६७.९५ प्रति समभाग किंमत झालेली दिसली.
 
आज एकूणच एनर्जी, ऑइल समभागात मोठी घौडदौड पहायला मिळाली आहे.एनटीपीसी,ओएनजीसी, बीपीसीएलच्या समभागात ३ ते ५ टक्क्यांची दरवाढ पहायला मिळत आहे.निफ्टीवर एफएमसीजी (फास्ट मूव्हिंग कनज्यूमर गुड्स) व फार्मा कंपन्यांच्या बाजारात घसरण पहायला मिळत आहे.
 
यावेळी शनिवारी विशेष ट्रेडिंग सत्र बीएसी, एनएससी स्टॉक, दोन्ही एक्सचेंजेंसने आपल्या जाहीरनाम्यात सांगितले आहे. बीएससीवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.५७ लाख कोटी रुपयांनी वाढून ३८७.३ लाख कोटी रुपये झाले आहे. बाजाराची व्याप्ती बैलांच्या बाजूने ढासळली होती. बीएससी वर सुमारे २३५५ समभाग वधारून १५०३ समभाग घसरले आणि १३५ समभागांच्या किंमतीत कुठलाही बदल झालेला नाही.
Powered By Sangraha 9.0