भव्य शोभायात्रेतून सेवालाल महाराजांना अभिवादन

    15-Feb-2024
Total Views |

Pohradevi
(Sevalal Jayanti Poharadevi)

वाशीम :
बंजारा सामाजाची काशी म्हणून पोहरादेवीला ओळखले जाते. गुरुवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांच्या २८५ व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी धर्मगुरु महंत जितेंद्र महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. शोभायात्रेमध्ये बंजारा समाजाच्या बांधवांचा मोठा सहभाग होता. त्यासोबतच युवा पिढीनेसुद्धा शोभायात्रेत आपला विशेष सहभाग नोंदविला होता. दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक पोहरादेवी परिसरात निघाली होती. युवापिढी भगवा ध्वज फडकवताना यावेळी दिसून आली.