जपानला जर्मनीची टक्कर ! जपानला मागे टाकत जर्मनीची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर

15 Feb 2024 18:59:51

Germany
 
 
जपानला जर्मनीची टक्कर ! जपानला मागे टाकत जर्मनीची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर
 
 

आंतरराष्ट्रीय मॉनेटरी फंडच्या भाकितानुसार भारत येणाऱ्या काळात जपान व जर्मनीलादेखील मागे टाकण्याची शक्यता आहे.
 

मुंबई: एकेकाळच्या बलाढ्य आणि तिसऱ्या क्रमांकाच्या जपानच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देत जर्मनीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसेवांनी दिलेल्या माहितीनुसार जर्मनीने हे मोठी कामगिरी केली आहे. यामुळे जपानची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. गेलेल्या काही दिवसांत जपानमधील अंतर्गत व्यवस्थेतील त्रुटींमुळे जपानची पिछेहाट झाली आहे. जपानच्या लोकसंख्येत झालेली घट, कमी झालेला जन्मदर, कामगारांचा तुटवडा या प्रमुख कारणाने जपानची अर्थव्यवस्था तुलनेने मागे पडली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय मॉनेटरी फंडच्या भाकितानुसार भारत येणाऱ्या काळात जपान व जर्मनीलादेखील मागे टाकण्याची शक्यता आहे.
 
अधिकृत माहितीनुसार, जपान अर्थव्यवस्थेत १.९ टक्क्याने वाढ झाली आहे. जर्मनीचा जीडीपी ४.२ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचला आहे. परंतु त्याला आव्हान देत जर्मनीची अर्थव्यवस्था ४.५ ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे. यातील येन या चलनाची घसरलेली किंमत देखील अर्थव्यवस्था घसरण्याचे प्रमुख कारण समजले जात आहे. आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये युएस डॉलरचा तुलनेत जपानचा येनचे विनिमय मूल्य घसरले होते. अर्थतज्ज्ञांच्या मते २०२३ जपानच्या येन चलनाची ०.३ टक्क्याने घसरण झाली होती.
 
जागतिक पातळीवर सगळ्या सेंट्रल बँकने व्याजदरात वाढ करून महागाई दरावर नियंत्रण मिळवले होते. परंतु जपानच्या केंद्रीय बँकेने मात्र व्याजदरात कपात केली होती. रशिया युक्रेन युद्धाचा फटका जपानमधील उत्पादन कंपन्यांना झाला होता. आयात निर्यात व्यवसायातील कामगारांचा तुटवडा झाल्याने व्यवहारांच्या संख्येत घट झाली आहे. अशा विविध कारणांसाठी जपानला आर्थिक फटका बसला आहे.
 
दुसरीकडे अर्थतज्ज्ञांच्या मते जर्मनीची लोकसंख्या कमी झालेली असली तरी स्थिर अर्थव्यवस्थेचा फायदा जर्मनीला झाला आहे.
 
जपानला मागे टाकत जर्मनी तिसरी अर्थव्यवस्था बनली आहे.येणाऱ्या काळात भारत जपान जर्मनीला मागे टाकत भारत क्रमांक ३ ची अर्थव्यवस्था होईल असे इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितले आहे. भारताची स्थिर अर्थव्यवस्था व वाढणारी परदेशी गुंतवणूक, वाढलेला जीडीपी , वाढलेला विकासदर या गोष्टी भारतातल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा यशस्वी मंत्र आहे.
 
Powered By Sangraha 9.0