काँग्रेसनंतर उबाठा गटालाही दणका! 'या' नेत्याने दिला राजीनामा

15 Feb 2024 13:36:32

Thackeray


मुंबई :
काँग्रेसनंतर आता उबाठा गटातही राजीनामा सत्र सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. उबाठा गटाचे नेते बबनराव घोलप यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप हे शिवसेनेचे उपनेते आणि अनेकदा आमदार राहिले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असून यातूनच त्यांनी आता राजीनामा दिला आहे.
 
गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसमध्ये मोठे खिंडार पडले आहे. त्यानंतर आता उबाठा गटाचे नेते बबनराव घोलप यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
 
बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. परंतू, उद्धव ठाकरेंनी भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात प्रवेश दिल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. यातूनच त्यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, आता ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


 
Powered By Sangraha 9.0