भाजप, शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचाही उमेदवार निश्चित! राज्यसभेसाठी बड्या नेत्याची वर्णी

14 Feb 2024 19:06:59

NCP


मुंबई :
राज्यसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी गुरुवारी प्रफुल पटेलांच्या नावाची घोषणा केली.
 
येत्या २७ फेब्रुवारी राज्यात ६ जागांसाठी राज्यसभा निवडणुक पार पडणार आहे. या पार्श्वभुमीवर महायुतीतील सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपतर्फे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि भाजप वैद्यकीय आघाडीचे अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून हे सर्व नेते यादिवशी अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.



Powered By Sangraha 9.0