शिवसेनेचा उमेदवारही ठरला! राज्यसभेसाठी 'या' बड्या नेत्याला संधी
14 Feb 2024 14:46:37
मुंबई : लवकरच राज्यसभा निवडणुक पार पडणार असून आता शिवसेनेकडून आपला उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. मिलिंद देवरा यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपतर्फे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि भाजप वैद्यकीय आघाडीचे अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यसभेच्या १६ राज्यांतील रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दि.२९ जानेवारी २०२४ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या ५६ जागांमध्ये महाराष्ट्रातील ६ जागा आहे. २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभा निवडणुक होणार आहे. त्यासाठी १५ फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान, आता शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे.
काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याच मिलिंद देवरा यांना आता शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.