'महावितरण'कडून औद्योगिक ग्राहकांच्या सोयीसाठी "स्वागत सेल"

14 Feb 2024 17:42:19
Mahavitaran Swagat Sell

मुंबई :
महावितरणच्या भांडूप परिमंडलातील पेण, वाशी व ठाणे मंडलात औद्योगिक ग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने एक विशेष "स्वागत सेल"ची स्थापना केली आहे. महावितरणच्या संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांच्या आदेशानुसार मुख्य अभियंता भांडूप परिमंडल सुनील काकडे यांनी सर्व मंडळांना स्वागत सेलची स्थापना करणेबाबत सूचना दिल्या होत्या. सदर स्वागत सेल बाबत औद्योगिक ग्राहकांना माहिती देण्याकरिता पेण मंडळात औद्योगिक ग्राहकांच्या प्रतिनिधीसोबत एक बैठक घेण्यात आली.

नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार संबंधी स्वागत कक्षाकडे मागणी नोंदविल्यानंतर संबंधीत औदयोगिक ग्राहकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे, शुल्क आदींची माहिती स्वागत कक्षाकडून दिली जाईल. दोन कार्यालयीन दिवसांत कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाईन अर्ज व प्रक्रिया शुल्क भरण्याची कार्यवाही या कक्षाकडून केली जाईल. त्यानंतर लगेच स्थळ पाहणी करून तांत्रिक योग्यता तपासून कोटेशन देण्यासही नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात येईल.

यासोबतच वीजसेवा व बिलींग बाबतच्या तक्रारींचे निरसणही या कक्षाकडून कंपनीच्या कृती मानकाप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत किंवा त्यापूर्वी निराकरण करण्यात येईल. तरी जिल्हातील सर्व औदयोगिक ग्राहकांनी विजेसंबंधी त्यांना तात्काळ व दर्जेदार सेवा मिळण्यासाठी कार्यालयाच्या स्वागत कक्षाशी संपर्क करावा असे आवाहन महावितरणच्या भांडूप परिमंडलातर्फे करण्यात आले आहे.

तिन्ही मंडळात स्वागत कक्ष प्रमुख व औदयोगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत नुकतीच बैठक अयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत, औदयोगिक संघटना प्रतिनिधींशी वीजेसंबंधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी, स्वागत कक्ष स्थापन केल्याबद्दल सर्व संघटना प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले आहे.
 
स्वागत कक्षाचे ई-मेल व कक्षातील प्रमुखांचे भ्रमणध्वनी क्रमांक असे आहेत पेण मंडळ ई-मेल :swagatcell_pen@mahadiscom.in, नोडल अधिकारी, हरीदास चोंडे ९०२९११२७७७, कक्ष प्रमुख, जीवन पवार ९०२९१६५५०१ व सदस्य, संजय भोये ९०२९१०५५०५ असे आहेत.

वाशी मंडळ – ई मेल - swagatcell_vashi@mahadiscom.in, कक्ष प्रमुख, रामलिंग बेले-८८७९६२५०१२, सदस्य- प्रज्ञा पवार(वित्त व लेखा विभाग) - ९९३०२६९५०४, सदस्य- व्यंकटेश कासल (तांत्रिक विभाग) – ८८७९९७९२९९, सदस्य- सादेकपाशा इनामदार (तांत्रिक विभाग)- ९९३०२६९६२१, सदस्य- जितेंद्रकुमार अंबादे (तांत्रिक विभाग) - ९९३०२६९५१५, सदस्य- प्रणय चक्रवर्ती (तांत्रिक विभाग)- ९९३००२५७३५, सदस्य- अनिल जगजाप (तांत्रिक विभाग)-९९३०२६९५०६, सदस्य- विलास म्हस्के (माहिती व तंत्रज्ञान विभाग)-९०२९१०२५७६, संदीप मोरे (लेखा विभाग)- ९०२९१०२६०३. ठाणे मंडळ - ई मेल -swagathtthane@gmail.com कक्ष प्रमुख, सुनील माने- ८८७९६२५००५, सदस्य- संदीप घेगडमल-८८७९६२२५८०.

Powered By Sangraha 9.0