राज्यसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर! 'या' नेत्याला मिळणार तिकीट

14 Feb 2024 12:21:03

Congress


मुंबई :
राज्यसभेसाठी नुकताच काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. महाराष्ट्रातून काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभा निवडणुक होणार आहे. त्यासाठी १५ फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान, आता काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे.
 
यासोबतच राज्यसभेसाठी काँग्रेसने राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून अखिलेश सिंग, हिमाचल प्रदेशातून अभिशेक मनू सिंघवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभेच्या १६ राज्यांतील रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दि.२९ जानेवारी २०२४ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या ५६ जागांमध्ये महाराष्ट्रातील ६ जागा आहे.
 
दुसरीकडे, अशातच महाराष्ट्र काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. मुंबई काँग्रेसच्या तीन नेत्यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. यात जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा देत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवार काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Powered By Sangraha 9.0