मोदी सरकारची मोठी घोषणा; 'या' योजनेअंतर्गत ३०० युनिटपर्यत मोफत वीज

    13-Feb-2024
Total Views |
pm-modi-launches-free-solar-electricity-scheme
 
नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून देशभरातील १ कोटी घरांना सौरऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज देण्याची योजना सुरू केली आहे. ‘प्रधानमंत्री सूर्य घर : मोफत वीज योजना’ या योजनेतून ३०० युनिट वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहे. देशभरातील नागरिकांच्या शाश्वत विकास व समृध्दीसाठी ही योजना सुरू केली असून याचा कोट्यवधी नागरिकांना फायदा होणार आहे.


दरम्यान, या योजनेअंतर्गत ७५ हजार कोटी रुपये खर्चून दरमहा ३०० युनिट सौरउर्जा मोफत दिली जाणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Xवर पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधान म्हणाले, देशभरातील कोट्यवधी नागरिकांच्या घरांवर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहेत. या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी सरकारकडून एक वेबसाईट जारी करण्यात आली आहे. https://pmsuryaghar.gov.in येथे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

‘प्रधानमंत्री सूर्य घर : मोफत वीज योजना’ या योजनेंतर्गत, केंद्र सरकार ३ kW पर्यंत क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी १८,०००/kW ची सबसिडी देईल. ज्या राज्यांना विशेष दर्जा देण्यात आला आहे, तेथे ही रक्कम ₹ २०,०००/kWh असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची माहिती देताना सांगितले की, “शाश्वत विकास आणि सामान्य लोकांच्या फायद्यासाठी आम्ही पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना सुरू करत आहोत. यात ७५ हजार कोटींच्या गुंतवणुकीसह या योजनेचे उद्दिष्ट १ कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याचे आहे.”, असेही यावेळी स्पष्ट केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.