काँग्रेसचे आणखी दोन आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत?

    13-Feb-2024
Total Views |

Congress


मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसला चांगलीच गळती लागली असून आता आणखी दोन आमदार काँग्रेसचा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जितेश अंतापूरकर आणि मोहनराव हंबर्डे हे दोन नेते काँग्रेसची साथ सोडणार असल्याची माहिती मिळाली आहे.
 
नुकताच काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी यांनीदेखील भाजपचा हात सोडला. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन आमदार काँग्रेसला राम राम ठोकणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेश अंतापूरकर आणि मोहनराव हंबर्डे हे काँग्रेसचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ते दोघेही अशोक चव्हाण यांचे समर्थक असून येत्या आठवड्यात ते काँग्रेस सोडणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
 


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.