औद्योगिक उत्पादकता वाढीत थोडी घट…. आहेत ' ही ' कारणे

खाण व उर्जा क्षेत्रातील थंडावलेला विकासामुळे उत्पादन गोठले

    13-Feb-2024
Total Views |

Industrial Production
 
 
 
औद्योगिक उत्पादकता वाढीत थोडी घट.... आहेत ' ही ' कारणे
 

खाण व उर्जा क्षेत्रातील थंडावलेला विकासामुळे उत्पादन गोठले
 

मुंबई: भारतातील औद्योगिक क्षेत्रातील बातमी समोर आली आहे. सरकारने प्रकाशित केलेल्या नव्या माहितीनुसार, औद्योगिक उत्पादनातील वाढ थंड झाली असून प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनातील डिसेंबर वाढ ४.६ टक्के होती. जी आधीच्या महिन्यात व प्रामुख्याने ८.५ टक्के होती. या कालावधीत उत्पादन वाढीचा वेग थंडावल्यामुळे याचे प्रतिबिंब सरकारी आकड्यात जाणवत आहे. प्रामुख्याने खाण व उर्जा क्षेत्रातील थंडावलेला विकास यामुळे ही एकंदर उत्पादन वाढ गोठली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन (आयआयपी) डिसेंबर २०२२ मध्ये ६.१ टक्के इतका होता. तत्पूर्वीच्या आर्थिक वर्षात उत्पादन वाढ ५.५ टक्के इतकी राहिली आहे. आकडेवारी व अंमलबजावणी मंत्रालयाकडून पुढे आलेल्या माहितीनुसार उत्पादन वाढ डिसेंबर २०२३ मध्ये ३.८ इतकी होती.
 
आयसीआरए रेटिंग मुख्य अर्थशास्त्रज्ञ आदिती नायर म्हणाल्या, ' कोर क्षेत्र वाढीतील मंदीच्या विरोधात आय आय पी मधील वार्षिक वाढ डिसेंबर २३ मध्ये ३.८ टक्के होती. नोव्हेंबर २३ मध्ये ती २.४ टक्के होती. उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीत सुधारणा झाल्यामुळे, वापर आधारीत श्रेणीतील संदर्भात, डिसेंबर २३ मध्ये फक्त प्राथमिक वस्तूंच्या नियंत्रणात बदल झाल्याचे दिसून आले आहे. इतर. पाचही श्रेणीत सुधारणा झाली आहे.
 
जानेवारी २०२४ साठी उपलब्ध असलेल्या आश्वासक माहितीवर नायर म्हणाल्या, ' आम्ही या महिन्यात आय आय पी मध्ये ४ ते ६ टक्के वाढ होईल अशी अपेक्षा करतो. '
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.