निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार सुप्रीम कोर्टात

    13-Feb-2024
Total Views |
Sharad Pawar files appeal in Supreme Court against Election Commission

नवी दिल्ली :
शरद पवार यांनी त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे बहुमत विचारात घेऊन अजित पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा आणि घड्याळ हे चिन्ह वापरण्याचा आदेश दिला होता. निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विधानसभेत राष्ट्रवादीच्या एकूण आमदारांची संख्या ८१ आहे.

त्यापैकी अजित पवार यांनी त्यांच्या समर्थनार्थ ५७ आमदारांची शपथपत्रे दाखल केली, तर शरद पवार यांच्याकडे केवळ २८ प्रतिज्ञापत्रे होती. हे पाहता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला आमदारांचा बहुमताचा पाठिंबा आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करू शकतात, असा निष्कर्ष आयोगाने काढला.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयास शरद पवार यांच्या गटातर्फे आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.