"कर्नाटकमध्ये हिंदूंवर हल्ले होत आहेत"

    13-Feb-2024
Total Views |
 RAHUL GANDHI
 
बंगळुरु : "कर्नाटक राज्यात दहशतवादी घटना वाढल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा काँग्रेस सरकारचा दावा लाजिरवाणा आहे. सरकारने हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवला आहे. काँग्रेस सरकारने मुस्लिमांसाठी १,००० कोटी रुपये जारी केले आणि इतर समुदायांसाठी नुकसान भरपाईची मागणी केली तेव्हा त्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवले त्यांनी निधी दिला नाही." असा आरोप कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला.
 
आर. अशोकांनी कर्नाटक सरकार राज्यपालांना आपल्या भाषणात खोटे दावे करायला सांगत आहे. असा आरोपही आर. अशोक यांनी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर केला. ते म्हणाले की, "राज्यात हिंदूंवर हल्ले होत असून काँग्रेस सरकार राज्यपालांना त्यांच्या अभिभाषणात खोटे बोलायला लावत आहे. यापूर्वीच्या भाजप सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांवर काँग्रेस दावा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला."
 
कर्नाटकच्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. त्याआधी कर्नाटकच्या विधानसभेत राज्यपालांचे अभिभाषण झाले. या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्ष असलेल्या भाजपने काँग्रेस सरकारवर टीका केली. कर्नाटकमधील काँग्रेस सरकार हे हिंदू आणि हिंदूत्व विरोधी आहे, असा आरोप भाजपने केला.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.