हा काँग्रेससाठी 'वेक अप कॉल' आहे! 'या' बड्या नेत्याची प्रतिक्रिया

    13-Feb-2024
Total Views |

Congress


मुंबई :
हा काँग्रेससाठी 'वेक अप कॉल' आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी दिली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच बाबा सिद्दीकी यांनीदेखील काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला.
 
बाबा सिद्दीकी म्हणाले की, "अशोक चव्हाण यांनी मला फोन केला तेव्हा मी त्यांना गमतीत म्हणालो होतो की, तुम्हीसुद्धा याच रस्त्यात मला भेटणार आहात तर मला का फोन करत आहात. यावर ते म्हणाले की, मी तुम्हाला विचारत आहे आणि तुम्ही मला. आता तर आणखीही काही लोकं येतील. कारण माणसाची जेव्हा घुसमट होते तेव्हा तो आपला मार्ग शोधतो."

 
ते पुढे म्हणाले की, "हा काँग्रेससाठी वेक अप कॉल आहे. पण ते जागे होतील, असं मला वाटत नाही. कारण ते एका भ्रमात राहतात. १८८५ पासूनचा पक्ष लोकं सोडून जात आहेत. याला काहीतरी कारण असेलच. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा गेलेत आणि आता आणखीही जातीलच," असेही ते म्हणाले आहेत.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.