अनिल बोरनारे यांचा नवा रेकॉर्ड; 'गोल्डन गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड'ने घेतली दखल

भारतातील सर्वाधिक शैक्षणिक समस्या मांडल्याचा केला रेकोर्ड; अविरत, अविश्रांत केलेल्या कार्याचा सन्मान

    13-Feb-2024
Total Views |
Anil Bornare new record gold talent book of record

मुंबई :
शिक्षकांच्या व शिक्षणक्षेत्रातील सर्वाधिक समस्या मांडण्याचा रेकॉर्ड शिक्षक नेते व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांच्या नावावर नोंदविला असून गोल्डन गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ने याची दखल घेतली आहे. मुंबईतील छबिलदास हायस्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या शिक्षक मेळाव्यात त्यांना मान्यवरांच्या हस्ते रेकॉर्ड केल्याचे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व मेडल प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेच्या माध्यमातून व आता भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी मागील २४ वर्षांपासून शिक्षणक्षेत्रातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याचे काम केले. विना अनुदानित शाळांना अनुदान मिळण्यासंदर्भात मंत्रालयातील ४ मजल्यावरील केलेले धरणे आंदोलन असो की सहावा वेतन आयोगाच्या स्टॅम्पिंग घोटाळा उघड करून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना अद्दल घडविणे असो की सणासुदीला शिक्षकांना वेळेवर वेतन न मिळाल्याने शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यात घुसून काळी गुढी उभारणे असो मागील २४ वर्षांपासून एका दिवसाचीही विश्रांती न घेता शिक्षणक्षेत्रातील तसेच शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर आवाज उठवून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी अनिल बोरनारे कार्य करीत आहेत.

मुंबई कोकणसह राज्यातील हजारो शिक्षकांना त्यांच्या सेवाशर्तीचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत केली. शिक्षकांच्या शेकडो धरणे, ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. वृत्तपत्रात लेख लिहून आवाज उठवला, इलेक्ट्रॉनिक मिडियात शिक्षकांचा आवाज झाले. २४ वर्षात शेकडो निवेदने हजारो तक्रारपत्र लिहिलीत. शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. याचीच नोंद "ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकोर्ड" ने घेऊन भारतातील सर्वाधिक शिक्षकांच्या समस्या मांडण्याबाबत "भारतीय रेकोर्ड" झाला आहे. याबाबत GGT BOOK OF RECORD च्या अधिकाऱ्यांनी या रेकोर्ड चे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व मेडल मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.

रेकॉर्ड स्व. रामनाथ मोतें ना समर्पित
 
अनिल बोरनारे यांनी या रेकॉर्ड चे श्रेय शिक्षक चळवळीत त्यांनी ज्यांच्याकडून धडे गिरविले अश्या माजी शिक्षक आमदार स्व. रामनाथ मोते सर यांना देऊन हा रेकॉर्ड त्यांना समर्पित केला आहे. यापुढेही अधिक जोमाने शिक्षणक्षेत्रासाठी कार्य करणार असल्याचे बोरनारे यांनी सांगितले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.