ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवतींच्या तब्येतीबद्दल महत्वाची अपडेट

    12-Feb-2024
Total Views |

mithoon 
 
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने १० फेब्रुवारी २०२४ रोजी कोलकतामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असून तब्येतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे. मिथुन यांचे वय ७३ असून आताही ते चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहेत.
 
मिथुन यांच्या तब्येतीबद्दल माहिती देत असताना वैद्यकीय अधिकारी म्हणाले की, “ते बरे होत आहेत, ते पूर्णपणे शुद्धीवर आहेत आणि त्यांची प्रकृती आता चांगली आहे. त्यांनी आहारही घेतला आहे. डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांची तपासणी केली जाईल”.
मिथुन चक्रवर्ती यांनी आजवरच्या त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत हिंदी, बंगाली, ओडिया, भोजपुरी आणि तमिळ भाषेतील ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 
 
 
तसेच, केंद्र सरकारकडून प्रदान केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांच्या यादीत अभिनेते मिथुन यांचे देखील नाव असून त्यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी देशाच्या प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.