हार्दिक जोशी म्हणतोय, “काका मला वाचवा…”

    12-Feb-2024
Total Views |

hardik joshi 
 
मुंबई : मालिकाविश्वातून प्रेक्षकांच्या घराघरांत अनेक मराठी कलाकार पोहोचले. त्यातीलच एक चेहरा म्हणजे राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी. झी मराठी वाहिनीवरील जाऊ बाई गावात या कथाबाह्य कार्यक्रमात नुकताच तो सुत्रसंचलन करताना दिसला होता. आता मोठ्या पडद्याव हार्दिक जोशी दिसणार आहे. सुमित संघमित्र दिग्दर्शित 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटात हार्दिक आणि अभिनेते सुनील अभ्यंकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आणि या चित्रपटात पुतण्याच्या भूमिकेत असलेला हार्दिक काका मला वाचवा असे काकांना अर्थात सुनील अभ्यंकर यांना बोलताना दिसत आहे.
 

hardik  
 
आता चित्रपटाच्या नावातच लॉकडाऊन असल्यामुळे चित्रपटातून कोरोना काळातील एखादी भन्नाट गोष्ट दाखवली जाणार असे समजत आहे. शिवाय काका-पुतण्याच्या भूमिकेत असलेली ही दोघं काय धमाल आणतात हे प्रेक्षकांना ८ मार्च रोजी चित्रपटगृहात पाहता येणार आहे. अमोल कागणे प्रस्तुत ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे, सागर पाठक यांनी केली आहे. तर सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.