नितेश तिवारींच्या ‘रामायणा’त बीग बींची एन्ट्री?

    12-Feb-2024
Total Views |

amitabh bachchcan 
 
मुंबई : रामायणावर आधारित अनेक कलाकृती आजवर प्रेक्षकांच्या स्वाधीन केल्या आहेत. नाटक, मालिका किंवा चित्रपट या मनोरंजनाच्या विविध माध्यमातून रामायण दाखवले गेले. आता पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत 'रामायण' हा चित्रपट दिग्दर्शक नितेश तिवारी घेऊन येणार असून यात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन महत्वपुर्ण भूमिका साकारणार असे सांगितले जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन 'रामायण' या चित्रपटात राजा दशरथ यांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, अजूनही दिग्दर्शक नितेश तिवारी किंवा खुद्द अमिताभ बच्चन यांच्याकडून यावर प्रतिक्रिया समोर आली नाही. परंतु, अमिताभ बच्चन यांना राजा दथरथ किंवा रामायणातील अन्य कोणत्याही भूमिकेत पाहण्यास त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक आहेत.
 
दरम्यान, रामायण चित्रपटातील अन्य भूमिकांबद्दल बोलायचे झाल्यास चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका रणबीर कपूर, सीता मातेच्या भूमिकेत साई तर रावणाच्या भूमिकेत केजीएफ स्टार यश दिसणार आहे. 'रामायण' सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करणार असून हा चित्रपट २०२५ रोजी भेटीला येण्याची शक्यता आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.