मुख्याध्यापिका स्वाती होलमुखे यांच्या शैक्षणिक कार्याचा सन्मान

    12-Feb-2024
Total Views |
Prinicipal Swati Holmukhe honoured

मुंबई :
मुंबई मराठी शिक्षक संघ आणि जुनी पेन्शन संघर्ष समिती, छबिलदास हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने, छत्रपती शिवाजी विद्यालय (इंग्रजी माध्यम), धारावीच्या मुख्याध्यापिका स्वाती प्रमोद होलमुखे यांना त्यांच्या शिक्षणासाठी समर्पित कार्याबद्दल आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दरम्यान, मुख्याध्यापिका होलमुखे या शिक्षणाशी संबंधित कोणत्याही कामासाठी सदैव तत्पर असतात, मृदुभाषी आणि मनमिळाऊ स्वभावाच्या होलमुखे या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यास साहित्यासाठी मदत करण्यास सदैव तत्पर असतात, या कार्यक्रमाचे आयोजन छबिलदास हायस्कूल दादर सभागृहात करण्यात आले होते, सदर कार्यक्रम अनिल बोरनारे, रावजी राणे, छत्रपती शिवाजी विद्यालय माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वीणा डोणवलकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.