राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती सुरू, जाणून घ्या अंतिम मुदत

    12-Feb-2024
Total Views |
National Defence Staff Recruitment 2024
 
मुंबई :  राष्ट्रीय संरक्षण अकादमी(एनडीए), पुणे अंतर्गत विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून राष्ट्रीय संरक्षण अकादमीतील विविध रिक्त पदांवर काम करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एनडीए अंतर्गत होणाऱ्या भरतीद्वारे अधिसूचनेत प्रस्तावित असणाऱ्या विविध पदांच्या एकूण १९८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 'एनडीए'मधील रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्जशुल्कासंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, ड्रॉफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, कुक, कंपोझिटर-कम-प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, सुतार, फायरमन, टीए-बेकर आणि कन्फेक्शनर, टीए-सायकल रिपेयरर, टीए-प्रिंटिंग मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेअर टास्किंग स्टाफ-ऑफिस आणि प्रशिक्षण इ.


शैक्षणिक पात्रता -

सविस्तर तपशीलासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहावीवयोमर्यादा -

१८-२७ वर्षे


राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून दि. १६ फेब्रुवारी २०२४ असेल.
 
 
भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी 'राष्ट्रीय संरक्षण अकादमी'च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

'राष्ट्रीय संरक्षण अकादमी'चे अधिकृत वेबसाईट पाहण्याकरिता येथे क्लिक करा

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.