अशोक चव्हाणांची काँग्रेसला सोडचिठ्ठी! पटोले म्हणतात, "आम्ही निष्ठावंत..."

    12-Feb-2024
Total Views |

Ashok Chavan & Nana Patole


मुंबई :
काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नाना पटोले यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ही प्रतिक्रिया दिली आहे.

 
नाना पटोले आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू," असेही ते म्हणाले आहेत.
 
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी विधासभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला असून त्यांनी तो स्विकारला आहे. यानंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार का? अशा चर्चा रंगल्या असताना आपण याबाबत अजून विचार केला नसल्याचे चव्हाणांनी म्हटले आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.