ठाण्यात माघी गणेशोत्सवाची धूम; गतवर्षीपेक्षा यंदा २८ सार्वजनिक गणेशोत्सव

    12-Feb-2024
Total Views |
Maghi Ganeshotsav Festival in thane city

ठाणे :
भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच फेब्रुवारी महिन्यातील माघी गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. यंदाचा माघी गणेशोत्सव मंगळवार १३ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ठाणे पोलीस आयुक्तालयातील पाच परिमंडळात १५७ सार्वजनिक तर,१ हजार ७७६ घरगुती गणेशोत्सव साजरे होत आहेत. दरम्यान,शहरात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे.

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थीच्या दिवशी मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी गणपती विराजमान होणार आहेत.ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मागच्या वर्षी सार्वजनिक १२९ तर घरगुती १ हजार ४७२ गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. परंतू दिवसेंदिवस गणेश भक्तांची हौस वाढत आहे. यंदा ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळात सार्वजनिक गणेशोत्सवमध्ये २८ ने वाढ होऊन १५७ झाली आहे. तर घरगुती गणपतीमध्ये जवळपास ३०४ ने वाढ झाली आहे.

यावेळी कल्याणमध्ये ६६ सार्वजनिक तर ३२३ गणपतीचे आगमन होणार आहे. भिवंडी शहर क्षेत्रात घरगुती गणेशाची स्थापना करण्यात उत्साह दिसून येत असला तरी सार्वजनिक गणेशोत्सवाची संख्या अगदीच कमी म्हणजे ०६ असून घरगुती गणपती ६९३ आहेत. ठाणे शहर क्षेत्रात सार्वजनिक २२ तर घरगुती ३३६ गणपती, तर उल्हासनगर येथे ३३ सार्वजनिक, आणि २५९ घरगुती, वागळे इस्टेट क्षेत्रात ३० सार्वजनिक आणि १६५ ठिकाणी घरगुती गणपती बाप्पा साजरा होणार असल्याची माहिती विशेष शाखेकडून देण्यात आली.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.