काँग्रेसचा बडा नेता नार्वेकरांचा भेटीला! भाजपमध्ये प्रवेश करणार?

    12-Feb-2024
Total Views |

Mumbai Congress


मुंबई :
काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे, मुंबईतील भाजप कार्यालयात एका पक्षप्रवेशाची तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार का? तसेच ते भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
 
याशिवाय शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी अशोक चव्हाण हे जास्त दिवस काँग्रेसमध्ये राहणार नाही, असे वक्तव्य केले होते. परंतू, अशोक चव्हाण यांनी राहूल नार्वेकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचे स्पष्टीकरण दिले. याशिवाय अशोक चव्हाण यांचा फोनही नॉट रिचेबल येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाणार का? असा सवाल सध्या उपस्थित करण्यात येत आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.