काँग्रेसमध्ये दुसरा भूंकप! आणखी काही आमदार जाणार सोडून!

    12-Feb-2024
Total Views |

Maharashtra Congress


मुंबई :
काँग्रेसचे आणखी पाच आमदार राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकताच काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये दुसरा मोठा भूकंप होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. विश्वजीत कदम, जितेश अंतापुरकर, माधव जवळकर, अमित झनक, अमीन पटेल, असलम शेख, सुलभा खोडके, अमर राजूरकर आणि हिरामण खोसकर हे आमदार राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी अशोक चव्हाणांचा राजीनामा स्विकारला आहे. याशिवाय माजी आमदार हनुमंत बेटमोगरेकर, रमेश बागवे, आमदार मोहनराव हंबर्डे हेदेखील अशोक चव्हाणांसोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशोक चव्हाणांसारख्या बड्या नेत्याचा राजीनामा हा काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
 
याआधीही काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी आणि मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांनीदेखील पक्षाला रामराम ठोकला आहे. दरम्यान, यावर्षी लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. अशातच काँग्रेसला एवढं मोठं खिंडार पडलं आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.